Sri Lanka Power Cut : अख्खा देश अंधारात…!; Sri Lanka मधील लाईट का गेली?

Source : Google

Sri Lanka या देशातील बत्तीगुल आहे. संपूर्ण देशातील लाईट गेल्याने सगळीकडे अस्वस्थता पसरली आहे. मागच्या कित्येक तासांपासून श्रीलंकेत लाईट नाहीये...

Source : Google

श्रीलंकेतील सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने श्रीलंकेतील बत्तीगुल आहे. 2022 पासून श्रीलंका आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अशातच आता देशातील लाईटही गेली आहे.

Source : Google

कोटमाले-बियागामा दरम्यान ट्रान्समिशन लाइन तुटली आहे. यामुळे संपूर्ण श्रीलंकेतील बत्ती गुल आहे. यामुळे नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे.

Source : Google

सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड (सीईबी) ही कंपनी श्रीलंकेत वीज पुरवठा करते. मात्र सध्या यंत्रणेत बिघाड झाल्याने श्रीलंकेतील लाईट गेली आहे.

Source : Google

लाईट नसल्याने श्रीलंकेत इंटरनेट सुविधा देखील बंद आहे. त्याचा लोकांच्या सर्वच कामांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, मेडिकल कॉलेज आणि दवाखान्यांमध्ये मात्र आपत्कालीन इनव्हर्टरवर काम केलं जात आहे.