‘माझ्या आईवडिलांना टोमणे मारायचे, तिच्याशी कोणी लग्न करणार नाही’; Smriti Mandhana

Source : Google

भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने नुकतीच ‘कौन बनेगा करोडपती 15’च्या सेटवर हजेरी लावली. या खास एपिसोडमध्ये तिच्यासोबत क्रिकेटर इशान किशनसुद्धा सहभागी झाला होता. 

Source : Google

हॉटसीवर बसल्यानंतर सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी तिला तिच्या करिअर आणि खासगी आयुष्याविषयी काही प्रश्न विचारले. त्यात स्मृतीच्या लग्नाचाही विषय होता. 

Source : Google

त्यांच्या प्रश्नांची उत्तरं तिने अत्यंत मोकळेपणे दिली. या शोमध्ये स्मृतीने तिचा आतापर्यंतचा प्रवाससुद्धा सांगितला.  

Source : Google

स्मृतीचे वडील आणि भाऊ हे क्रिकेटमध्येच होते. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांनी क्रिकेट खेळावं आणि त्यापैकी किमान एकाने तरी भारताचं प्रतिनिधित्व करावं,  

Source : Google

असं वडिलांचं स्वप्न असल्याचं ती म्हणाली. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधान आणि भाऊ श्रवण यांनी सांगलीसाठी जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळलं होतं. 

Source : Google

क्रिकेटच्या प्रवासाबद्दल बोलताना स्मृती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की मी आईच्या गर्भात असल्यापासूनच क्रिकेटविषयी समजू लागले होते. नेटच्या मागे उभं राहून माझ्या भावाला खेळताना पाहून मी बॅटिंग शिकले. 

Source : Google

मी खरंतर उजव्या हाताने बॅटिंग करते. पण माझा भाऊ डाव्या हाताने खेळायचा, म्हणून त्याला पाहून पाहून मी डाव्या हाताने बॅटिंग करायला शिकले. 

Source : Google

अशाच प्रकारे मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.” यानंतर बिग बी तिला तिच्या आव्हानांविषयी प्रश्न विचारतात. 

Source : Google

“खेळाच्या बाबतीत तू कोणत्या आव्हानांचा सामना केलास? त्या आव्हानांवर तू कशी मात केलीस”, असा सवाल त्यांनी केला.