App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, Phone मध्ये लगेच करा ही Settings

तुमच्या Smartphone मधून Third Party Apps काढून टाकल्यानंतरही हॅकर तुमच्या डिव्हाइसमधून Data Leak (डेटा चोरी) होऊ शकतो. हे थांबवण्यासाठी तुम्हाला फोनमध्ये काही महत्त्वाच्या Settings कराव्या लागतील.

सर्वप्रथम, तुमच्या फोनच्या सेटिंग्जवर जा आणि Google Services सर्च करा.

येथे तुम्हाला Settings For Google Apps हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा आणि पुढील पर्यायावर जा.

पुढील पेजवर गेल्यावर तुम्हाला Connected Apps चा पर्याय दिसेल. येथे टॅप करून पुढे जा.

पुढील पृष्ठावर तुम्हाला तुमच्या Google खात्याशी लिंक असलेले Apps आणि सेवांची यादी दिसेल.

या यादीमधील तुम्हाला नको असलेले किंवा तुम्ही ॲप डिलीट करूनही लिंक दिसत असलेले अॅप्स निवडा आणि पुढे जा.

येथे तुम्हाला Delete All Connections हा पर्याय दिसेल. त्यावर टॅप करावे लागेल आणि पुढे जावे लागेल.

यानंतर, पुष्टी पर्याय म्हणून Confirm हा पर्याय निवडा आणि प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. लक्षात ठेवा, तुम्ही एका वेळी फक्त एक अॅप डिस्कनेक्ट करू शकता.

अशा प्रकारे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर अॅप किंवा सेवा खंडित झाल्याचा संदेश मिळेल. तुम्ही परत जाऊन ते तपासू शकता आणि अशा प्रकारे डेटा चोरी टाळू शकता.