Shivraj singh chauhan | ‘मागण्यापेक्षा मी मरण….’, मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचं मोठ वक्तव्य

Source : Google

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नव्या व्यक्तीची निवड झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पत्रकार परिषद घेतली. निरोपाच भाषण असतं, तसच शिवराज सिंह चौहान या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलले.  

Source : Google

पण त्यांची दोन वक्तव्य राजकारणाची जाण-समज असणाऱ्यांसाठी महत्त्वाची आहेत. 

Source : Google

‘मी स्वत:साठी काही मागण्यापेक्षा मरण पसंत करेन’ असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. छिंदवाडामधून निवडणूक लढणार का? यावर त्यांनी ‘मी स्वत:च्या बाबतीत कोणताही निर्णय घेत नाही’ असं उत्तर दिलं. 

Source : Google

शिवराज सिंह चौहान यांनी नवीन मुख्यमंत्री मोहन यादव यांना शुभेच्छा दिल्या. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश विकास आणि प्रगतीची नवीन उंची गाठेल अशी अपेक्षा सुद्धा शिवराज यांनी व्यक्त केली.  

Source : Google

आज माझ्या मनात समाधानाची भावना आहे, असं शिवराज म्हणाले. मध्य प्रदेशात भारतीय जनता पार्टीच्या ऐतिहासिक विजयामागे लाडली बहन योजना आहे, त्या बद्दलही ते बोलले.