Shark Tank India चा तिसरा सीजन या दिवशी सुरु होणार, हे असतील नवीन शार्क

Source : Google

शार्क टँक इंडिया या भारतात देखील आता चांगलाच लोकप्रिय टीव्ही शो बनला आहे. पहिले 2 सीझन खूप गाजले. त्यानंतर आता प्रेक्षकांना तिसऱ्या सीजनची उत्सुकता लागून राहिली आहे. 

Source : Google

तिसऱ्या सीजनची प्रतिक्षा संपली असून हा शो २२ जानेवारीला OTT प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार आहे.  शार्क टँक इंडिया 3 ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 

Source : Google

22 जानेवारी 2024 पासून हा शो सुरू होणार आहे. हा शो सोनी लाइव्ह अॅपवर प्रसारित होईल. शोच्या नवीन प्रोमोसह सोनी लिव्ह अॅपने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

Source : Google

या व्हिडिओ प्रोमोमध्ये एक तरुण दिसत आहे जो आपली कॉर्पोरेट नोकरी सोडून स्टार्टअप सुरु करतो. त्याचे सर्व मित्र त्याला निरोप देत आहेत. प्रोमोच्या शेवटी तो तरुण शार्क टँकमध्ये येतो. त्याच्या 

Source : Google

शार्क टँकचा हा सीझनही खूप रोमांचक ठरणार आहे. कारण या शोमध्ये आता आणखी काही शार्क दिसणार आहेत. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, नमिता थापर, विनिता सिंग, अमित जैन आणि पियुष बन्सल यांच्यासह अनेक नवीन उद्योजक तिसऱ्या सीजनमध्ये दिसणार आहेत.

Source : Google

2022 मध्ये दुसरा सीजन आल्यानंतर तो देखील चांगलाच चर्चेत राहिला. आता याचा तिसरा सीजन देखील आगमनासाठी तयार आहे.