SA vs IND | शतकवीर सूर्यकुमार यादवला मोठी दुखापत, हेल्थबाबत मोठी अपडेट समोर
Source : Google
टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टी-20 मधील चौथं शतक ठोकत मोठा विक्रम रचला.
Source : Google
या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव जखमी झाला होता, त्याला चालू सामन्यातून बाहेर जावं लागलं होतं.
Source : Google
सुर्याला टीम स्टाफमधील दोघांनी उचलून बाहेर नेलं होतं. सूर्याला आता चालता येत आहे की नाही याबाबतची माहिती समोर आली आहे.
Source : Google
टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेच्या बॉलर्सचा धुराळा केलेला पाहायला मिळाला. सुरूवातला यशस्वी जयस्वाल याने तर त्यानंतर सूर्याने चालवलेल्या दांडपट्ट्यासमोर आफ्रिकेच्या गोलंदाजांचा निभाव लागला नाही.
Source : Google
टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 201-7 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला सुुरूवातीपासूनच टीम इंडियाने धक्के दिले होते. मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये टीम इंडियालाही झटका बसला होता.
Source : Google
टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला फिल्डिंग करताना दुखापत झाली होती. सूर्याला बाहेर नेण्यासाठी दोन जणांची मदत घ्यावी लागली होती.
Source : Google
चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या सूर्याला अशा अवस्थेत बाहेर नेलं जात असल्याने अनेकांना धक्का बसला.
Source : Google
टी-20 क्रिकेटचा बादशहा म्हणून सूर्याकडे पाहिलं जातं त्यामुळे टी-वर्ल्ड कप आधी त्याला दुखापत होणं हा मोठा धक्का मानला जात आहे.