आम्ही Hardik ला कॅप्टन करतोय! MIनं रोहित शर्माला सांगितलं; अशी होती हिटमॅनची रिऍक्शन
Source : Google
मुंबई इंडियन्सला पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावून देणाऱ्या रोहित शर्माला संघ व्यवस्थापनानं कर्णधारपदावरुन हटवलं आहे. रोहितनं संघाची धुरा हाती घेतली त्यावेळी संघाला ५ पैकी एकाही हंगामात जेतेपद मिळवता आलं नव्हतं.
Source : Google
पण रोहितनं कर्णधारपदाची सुत्रं हाती घेताच पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घेतली. मुंबईनं आता कर्णधारपदाची सुत्रं हार्दिक पांड्याकडे सोपवली आहेत.
Source : Google
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होत असनाताच मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्याच्या घरवापसीची कल्पना रोहितला दिली होती. पांड्यानं पुन्हा संघात परतणार आहे आणि त्याच्याकडे संघाचं नेतृत्त्व सोपवण्यात येणार आहे,
Source : Google
असं संघ व्यवस्थापनाकडून रोहित शर्माला सांगण्यात आलं. कर्णधारपदाच्या अटीवरच हार्दिकनं मुंबईच्या संघात परतण्यास होकार दिला होता, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.
Source : Google
संघाच्या भविष्यातील योजनांची कल्पना रोहित शर्माला मुंबई इंडियन्सकडून देण्यात आली. त्यानंतर बैठकांचं सत्र सुरू झालं.
Source : Google
संघाच्या नेतृत्त्वात तातडीनं बदल करण्याची गरज असल्याचं रोहितला सांगण्यात आलं. यानंतर रोहितनं पांड्याच्या नेतृत्त्वाखाली खेळण्यास होकार दर्शवला.
Source : Google
हार्दिकनं घरवापसी करावी यासाठी मुंबईनं प्रयत्न केले. त्यांनी हार्दिकची संपर्क साधला. तेव्हा हार्दिकनं कर्णधारपदाची मागणी केली.