IND vs AFG : हिटमॅनचं टी20 वर्ल्डकपच्या दिशेने पहिलं पाऊल, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माकडे मोठी जबाबदारी
Source : Google
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात कसोटी सामना सुरु असून या मालिकेत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवत आहे. वनडे आणि टी20 मालिकेत रोहित खेळला नव्हता.
Source : Google
त्यामुळे Rohit Sharma आता यापुढे फक्त कसोटी सामन्यातच खेळताना दिसेल अशी चर्चा होती. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळताना दिसेल.
Source : Google
असं सर्व असताना Rohit Sharma च्या चाहत्यांसाठी एक गूड न्यूज आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Source : Google
दुसरीकडे, या मालिकेत कोण नेतृत्व करणार? असा प्रश्न पडला आहे. कारण हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव दोघंही जखमी आहेत. त्यामुळे तिसऱ्या पर्यायाकडे पाहिलं जात आहे.
Source : Google
यासाठी Rohit Sharmaच योग्य उमेदवार असल्याचं सध्यातरी दिसत आहे. या मालिकेतून रोहित शर्माला टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळेल अशी चर्चा रंगली आहे.
Source : Google
Rohit Sharma 2022 टी20 वर्ल्डकपनंतर एकही आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळलेला नाही. तर वर्षभर नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हाती होतं.