One Day World Cup स्पर्धेतील पराभव पचवणं सोपं नव्हतं, कर्णधार Rohit Sharma ने केलं मन मोकळं
Source : Google
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे दहा वर्षानंतर आयसीसी चषक जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा भंगलं.
Source : Google
कर्णधार Rohit Sharma आणि Virat Kohli यांना अश्रू अनावर झाले. या घटनेला आता 24 दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे.
Source : Google
भारतीय संघ पुन्हा एकदा नव्या जोमाने पुढच्या तयारीसाठी लागला आहे. जून 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी आतापासून तयारी केली जात आहे.
Source : Google
ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यात खेळाडूंची चाचपणी केली जात आहे.
Source : Google
असं सर्व चित्र असताना कर्णधार Rohit Sharma याने बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत भावनांना मोकळी वाट करून दिली.
Source : Google
“मला या पराभवातून कसं सावरायचं ते कळत नव्हतं. पहिले काही दिवस मी पूर्णपणे अस्वस्थ होतो. माझे कुटुंब, मित्र मला सावरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत होते.
Source : Google
मला सावरण्यासाठी जे काही शक्य आहे ते करत होते. त्यामुळे यातून बाहेर निघण्यास मदत झाली. खरं तर हे पचवणं खूपच कठीण आहे.
Source : Google
पण जीवनात पुढे जाणंही गरजेचं आहे. पण खरं सांगायचं तर ते खूपच कठीण होतं. पुढे जाणं वाटतं तितकं सोपं नव्हतं.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.