Rajinikant यांच्या संपत्तीचा आकडा पाहून तुम्हालाही फुटेल घाम; 2000 रुपयांपासून केली होती सुरुवात

Source : Google

दक्षिण भारतात ज्यांची देवासारखीच पूजा होते, ज्यांना देवाइतकाच मान मिळतो.. असे सुपरस्टार रजनीकांत यांचा संपूर्ण जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. 

Source : Google

आज 12 डिसेंबर रोजी त्यांचा 73 वा वाढिदवस आहे. एकेकाळी कंडक्टरची नोकरी करणारी सर्वसामान्य व्यक्ती पुढे जाऊन संपूर्ण जगावर राज्य करेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल.  

Source : Google

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी रजनीकांत हे छोटी-मोठी कामं करून उदरनिर्वाह करायचे. अभिनयात पाऊल ठेवल्यानंतर त्यांना सुरुवातीला फक्त 2000 रुपये मानधन मिळालं होतं. 

Source : Google

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासोबत काम केलं होतं. यामध्ये ते त्यांच्या सावत्र मुलाच्या भूमिकेत होते. याच भूमिकेसाठी त्यांना दोन हजार रुपये मिळाले होते. 

Source : Google

सध्या तेच रजनीकांत हे एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन स्वीकारतात.  

Source : Google

काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांनी 110 कोटी रुपये फी आकारली होती. 

Source : Google

‘फायनान्शिअल एक्स्प्रेस’ने दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांची एकूण संपत्ती ही 430 कोटी रुपये इतकी आहे. त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे.  

Source : Google

यामध्ये 6.5 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉयस फँटम आणि 6 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.  

Source : Google

याशिवाय त्यांच्याकडे 1.77 पासून 67.90 कोटी रुपयांपर्यंत BMW X5, 2.55 कोटी रुपयांची Mercedes Benz G Wagon, 3.10 कोटी रुपयांची Lamborghini Urus, 

Source : Google

Premier Padmini, Toyota Innova, आणि Hindustan Motors Ambassador सुद्धा आहेत.