सोशल मीडियावर Raha Kapoor चीच चर्चा; Ranbir-Aaliaने पहिल्यांदाच दाखवला चेहरा

Source : Google

अभिनेता Ranbir Kapoor आणि Aalia Bhatt ने ख्रिसमसनिमित्त अखेर लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. राहा कपूरला त्यांनी पापाराझींसमोर आणलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राहाचीच जोरदार चर्चा आहे.

Source : Google

ख्रिसमसनिमित्त संपूर्ण कपूर कुटुंब एकत्र येतं. त्यामुळे रणबीर आणि आलियासाठी हा दिवस खूपच खास आहे. कपूर कुटुंबीयांच्या लंचला जाण्यापूर्वी रणबीर-आलियाने राहाला पापाराझींसमोर आणलं.

Source : Google

राहाने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. तिचा हा क्यूट अंदाज नेटकऱ्यांचा खूप भावला. राहा ही तिचे आजोबा आणि रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यासारखीच दिसते, असे कमेंट्स अनेकजण करत आहेत.

Source : Google

Ranbir Kapoor आणि Aali Bhatt यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर जूनमध्ये आलियाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 रोजी तिने मुलगी राहा कपूरला जन्म दिला.

Source : Google

Ranbir आणि Aalia ने आतापर्यंत राहाचा फोटो कुठेच पोस्ट केला नव्हता. इतकंच नव्हे तर त्यांनी पापाराझींनाही तिचे फोटो क्लिक न करण्याची विनंती केली होती. आता वर्षभरानंतर त्यांनी राहाला सर्वांसमोर आणलं आहे.