‘दगडू’चं ठरलंय हा! खऱ्या आयुष्यातील प्राजूसोबत थाटात पार पडलं केळवण
Source : Google
‘टाइमपास’ या चित्रपटात दगडूची भूमिका साकारून प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणारा अभिनेता प्रथमेश परबच्या खऱ्या आयुष्यात आता ‘प्राजू’ची कायमची एण्ट्री झाली आहे.
Source : Google
प्रथमेश लवकरच गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधणार आहे. ही आनंदाची बातमी त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे.
Source : Google
प्रथमेश आणि क्षितिजा हे गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. आता दोघंही त्यांच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात एकत्र करणार आहेत.
Source : Google
‘#प्रतिजाचं ठरलंय हा! बाकी तारीख लवकरच कळवतो. (ता. क. – तारीख खूपच स्पेशल आहे. हिंट कॅप्शनमध्येच आहे. कमेंटमध्ये अंदाज व्यक्त करा. तोवर नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा)’,
Source : Google
असं त्याने या केळवणाच्या फोटोसोबत लिहिलंय. या फोटोवर नेटकऱ्यांसोबतच मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी कमेंट्स करत प्रथमेश आणि क्षितिजाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Source : Google
काही महिन्यांपूर्वी प्रथमेशने त्याच्या रिलेशनशिपची जाहीर कबुली दिली होती. प्रथमेश हा फॅशन मॉडेल क्षितिजा घोसाळकरला डेट करतोय. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.