अभिनेते प्रकाश राज यांना ईडीची नोटीस; त्या १०० कोटींबद्दल होणार चौकशी
लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे.
Arrow
Image Source : Google.com
तामिळनाडूतील एका ज्वेलरी फर्मच्या पॉन्झी स्कीम प्रकरणात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Image Source : Google.com
प्रकाश राज हे आपल्या परखड वक्तव्यांसाठी आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखले जातात.
Image Source: Google.com
त्यांनी यापूर्वी अनेकदा सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आता त्यांची ईडी कडून चौकशी होणार आहे.
Arrow
Image Source: Google.com
या प्रकरणी तपास यंत्रणेने २० नोव्हेंबर रोजी प्रणव ज्वेलर्सच्या जागेवर छापा टाकला होता.
Image Source: Google.com
तपास यंत्रणेने तेथून २० लाख रुपये आणि ११. ६० किलोचे दागिने जप्त केले होते.
Arrow
Image Source: Google.com
प्रकाश राज या कंपनीशी कसे जोडले गेले,
Arrow
Image Source: Google.com
तसेच पॉन्झी स्कीम चालवून लोकांची १०० कोटींची फसवणूक करणाऱ्या कंपनीबद्दल त्यांच्याकडे किती माहिती आहे
Arrow
Image Source: Google.com
याबद्दल विचारपूस करण्यासाठी ईडीने त्यांना समन्स बजावले आहेत.
Arrow
Image Source: Google.com