’22 जानेवारीला दिवाळी साजरी करा, घराघरात दिवे लावा’, मोदींचे आवाहन

Source : Google

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन झालं. 

Source : Google

त्यांच्या हस्ते आज पुनर्विकासीत करण्यात आलेल्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन झालं. तसेच त्यांच्या हस्ते अयोध्या विमानतळाचं देखील उद्घाटन झालं. 

Source : Google

नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात देशातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं. 

Source : Google

अयोध्येतील राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार आहे. त्यामुळे या दिवशी देशातील सर्व नागरिकांनी दिपोत्सव साजरी करा, घराघरात दिवे लावा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. 

Source : Google

“देशाच्या इतिहासात 30 डिसेंबरची तारीख खूप ऐतिहासिक राहिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आजच्याच दिवसी 1943 मध्ये अंदमानमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा जयघोषाचा झेंडा फडकवला होता. 

Source : Google

स्वातंत्र्याच्या दिवशी जोडल्या गेलेल्या अशा पवित्र दिवशी आज आपण स्वातंत्र्याच्या अमृतकाळ संकल्पाला पुढे नेत आहोत.  

Source : Google

आज विकसित भारताच्या निर्माणाला गती देण्याच्या अभियानाला अयोध्या नगरीला नवी ऊर्जा मिळाली. आज इथे 15 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांच्या विकासकामांचं लोकार्पण झालं आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.