Virat Kohli पंगा मग झाली मैत्री, आता थेट आयपीएल स्पर्धेतून बाहेर! ‘त्या’ निर्णयामुळे नवीन उल हकचे ग्रह फिरले
Source : Google
आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली. आयपीएल मिनी लिलावात याचा अंदाज आला आहे. कोट्यवधी रुपयांची उधळण करून खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे.
Source : Google
पण आता अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नवीन उल हक यांच्यावर कारवाई केली आहे.
Source : Google
या तिघांनी अफगाणिस्तानसाठी खेळण्याऐवजी खासगी हिताला प्राधान्य दिल्याचं समोर आलं आहे. यासाठी बोर्डाने 2024 वर्षासाठी वार्षिक करार करण्यास दिरंगाई केली आहे.
Source : Google
तसेच पुढच्या दोन वर्षात या तिघांना एनओसी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मागच्या काळात दिलेली एनओसीदेखील रद्द केली आहे.
Source : Google
त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना आयपीएल 2024 स्पर्धा खेळणंही कठीण आहे. कारण आयपीएलमध्ये खेळण्यासाठी देशातील क्रिकेट बोर्डाची एनओसी गरजेची आहे.
Source : Google
तीन खेळाडूंना एनओसी मिळाली नाही तर फ्रेंचायसीला धक्का बसणार आहे. यात कोलकाता, हैदराबद आणि लखनऊचा समावेश आहे.