'बाईपण भारी देवा', 'आत्मपॅम्पलेट' ते 'झिम्मा २', हे आहेत २०२३ मधील टॉप १० चित्रपट, तुम्ही किती पाहिलेत?

Source : Google

२०२३ हे वर्ष आता सरत आलं आहे. या वर्षाचे शेवटचे १५ दिवस उरले आहेत. यावर्षी मराठी चित्रपटसृष्टीने अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. 

Source : Google

या वर्षी महिलांनी बॉक्स ऑफिसवर आपली ताकद दाखवून दिली. यासोबतच अनेक गोष्टींवर गांभीर्याने विचार करायला लावणारे चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आले. 

Source : Google

Aatmapamphlet : परेश मोकाशी दिग्दर्शित 'आत्मपॅम्पलेट' या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात स्वातंत्र्यपूर्व काळासोबतच एक प्रेमकहाणी, राजकारण, क्रिकेट, मानवता यासारख्या अनेक विषयावर विनोदी पद्धतीने बोट ठेवलं आहे. 

Source : Google

Bai Pan Bhari Deva : बाईपण भारी देवा' या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सहा बहिणींची कथा असलेला हा चित्रपट ज्यात मंगळागौरीचा खेळ या विखुरलेल्या बहिणींना एकत्र आणतो.  

Source : Google

Maharashtra Shahir : हा एक मराठी चरित्रपट आहे, जो महाराष्ट्रीय गायक, नाटककार, लोकनाट्य निर्माते आणि दिग्दर्शक शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. 

Source : Google

हा चित्रपट केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केला असून याची निर्मिती संजय छाबरिया आणि बेला शिंदे यांनी केली आहे. प्रमुख भूमिकांमध्ये अंकुश चौधरी आणि सना केदार-शिंदे आहेत. 

Source : Google

Valavi : या चित्रपटाने तर सगळ्यांनाच कोड्यात टाकलं होतं. परेश मोकाशी दिग्दर्शित 'वाळवी' एक उत्कृष्ट चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद लाभला. 

Source : Google

'Jhimma 2' ने तर २०२३ गाजवलं असं म्हणावं लागेल. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्रींची फौज होती. आणि या अभिनेत्रींनी प्रेक्षकांना हसवता हसवता डोळ्यात पाणी आणलं.

Source : Google

Sarala Ek Koti : एक गरीब हातमजूर आणि त्याची सौंदर्यवती बायको यांच्या हुशारीचा खेळ म्हणजे 'सरला एक कोटी'. यात सरला थेट डावावर लावली जाते मात्र चित्रपटातील प्लॉट ट्विस्ट पाहून सगळेच चकीत झाले. 

Source : Google

Subhedar : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वीर मावळे सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'सुभेदार' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

Source : Google

Tendlya : तेंडल्या ही सचिन तेंडुलकरच्या दोन कट्टर चाहत्यांची कथा आहे, जी महाराष्ट्राच्या एका गावातली आहे. पहिला एक १० वर्षांचा मुलगा आहे जो त्याच्यासारखे खेळण्याची इच्छा बाळगतो, परंतु तो तसा खेळू शकत नाहीये. 

Source : Google

TDM :  टीडीएम हा चित्रपट तळागाळातल्या सर्वसामान्य मुलांच्या आयुष्यावर भाष्य करतो. ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा असा फुल फॉर्म असलेला हा चित्रपट ग्रामीण बाज असल्याने सगळ्याच्या पसंतीस उतरला होता. 

Source : Google

'Ghar Banduk Biryani' या चित्रपटात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांसारखे कलाकार होते. नक्षलवाद्यांच्या आयुष्यावर हसत हसवत केलेलं भाष्य म्हणजे हा चित्रपट होय.