दिवसभर पाहता येणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’; खळखळून हसत करा वर्षाचा शेवट

Source : Google

संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे. 

Source : Google

या वर्षात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. आता वर्षाअखेरीस अधिकाअधिक मनोरंजन करता यावं यासाठी 31 डिसेंबर रोजी 

Source : Google

संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली प्रहसने दिवसभर दाखवली जाणार आहेत. रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’द्वारे सोनी मराठीवर पहायला मिळणार आहे. 

Source : Google

या वर्षभरातील तणावपूर्ण जीवनशैलीतून काही घटका निर्मळ आनंद घेता यावा म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ वर्षाअखेरीस संपूर्ण दिवस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

Source : Google

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या मालिकेच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट आनंद द्विगुणित करणारी आणि औत्सुक्याची असणार आहे. या जत्रेतली मंडळी प्रेक्षकांचे नवीन वर्ष हसरे करण्यासाठी आता सज्ज झाली आहेत. 

Source : Google

31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.