महादेव बेटिंग ॲप प्रकरणातील आरोपी अभिनेता Sahil Khan ची अटकपूर्व जामिनासाठी धाव
Source : Google
मुंबई पोलिसांनी 7 नोव्हेंबर रोजी महादेव बुक ॲपचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि शुभ सोनी या 31 जणांविरुद्ध फसवणूक आणि जुगाराच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला होता.
Source : Google
यामध्ये 31 जणांविरुद्ध एफआयआर, तर 32 क्रमांक अनोळखी लोकांविरुद्ध होता. या प्रकरणाची एफआयआर प्रत बाहेर आल्याने एक धक्कादायक खुलासा झाला.
Source : Google
त्यानुसार या एफआयआरमध्ये अभिनेता Sahil Khan चेही नाव होते. या एफआयआरमध्ये आरोपी क्रमांक 26 म्हणून अभिनेता Sahil Khan चे नाव असल्याची माहिती समोर आली होती.
Source : Google
विशेष म्हणजे अभिनेता साहिल खान याच्यावर महादेव ऑनलाइन ॲपशी संबंधित आणखी एक बेटिंग ॲप चालवल्याचा आरोप होता.
Source : Google
Sahil Khan याने केवळ प्रमोशनच केले नाही तर त्याने ॲप ऑपरेट करून त्या माध्यमातून प्रचंड नफा मिळवला, असा आरोप लावण्यात आला आहे.