ललित पाटील यांचे
आंतरराष्ट्रीय कनेक्शन,
आरोपी आणि ड्रग्स माफिया ललित पाटील सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे.
ललित पाटील याची पोलीस कोठडी २० नोव्हेंबर रोजी संपली होती.
त्यानंतर त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यावेळी पोलीस तपासातील महत्वाची माहिती न्यायालयात सादर करण्यात आली.
यासंदर्भात गोपनीय अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला.
त्यात ललित पाटील याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
यासंदर्भात काही गोष्टी तपासातून समोर आल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली.