भारत-पाकिस्तान संघ या देशात भिडणार, मोठी अपडेट आली समोर
Source : Google
पुढील वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार असून यादरम्यान भारत आणि पाकिस्तान आमनेसामने दिसणार आहेत. अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे या स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे.
Source : Google
यासाठी 20 संघ पात्र ठरले आहेत. या संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. एका गटात पाच संघ असणार आहेत.
Source : Google
या स्पर्धेचे ठिकाण अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नसले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अमेरिकेत होणार असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
Source : Google
भारत आणि पाकिस्तानसह एकूण 10 संघ अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत त्यांचे सुरुवातीचे गट स्टेज सामने खेळणार आहे. या काळात प्रेक्षक मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये येतील, अशी अमेरिकेला आशा आहे.
Source : Google
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया त्यांचे सर्व गट सामने कॅरेबियनमध्ये खेळणार हे निश्चित मानले जात आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की,
Source : Google
इंग्लंड आपले गट टप्प्यातील सामने खेळेल आणि जर संघ सुपर-8 साठी पात्र ठरला तर सुपर 8 फेरीतील सर्व सामने अँटिग्वा, बार्बाडोस आणि सेंट लुसिया येथे खेळवले जातील.