भारतात का वाढतोय हृदयविकाराचा धोका, पाहा काय आहेत कारणे?
Source : Google
गेल्या एका वर्षात भारतात हृदयविकाराच्या घटनांनी भीतीचे वातावरण तयार केले आहे. भारतात तरुण वयातही लोकांना हृदयविकाराच्या झटक्यामुळे जीव गमवावा लागत आहे.
Source : Google
अगदी वयाच्या 12 व्या वर्षीही मुलांना हृदयविकाराचा झटका आला आहे कोरोनानंतर हृदयविकारांमध्ये अचानक वाढ झाली आहे. यामुळे जगभरात चिंता वाढली आहे.
Source : Google
हृदयरोग ही जागतिक समस्या बनली आहे. काही वर्षांपूर्वी तो फक्त वृद्ध व्यक्तींमध्ये दिसत होता. पण आता तरुण वयातही लोकांना जीव गमवावा लागला आहे.
Source : Google
कोविड-19 नंतर जीवनशैलीवर वाईट परिणाम झाला आहे. असं तज्ज्ञांचं मत आहे. शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, नैराश्य, खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हा आजार वाढत आहे.
Source : Google
फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
Source : Google
2022 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने 32,457 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीचा हृदयाच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडला आहे.