Health : हिवाळ्यामध्ये कमी पाणी पित असाल तर होऊ शकतात हे गंभीर आजार

Source : Google

सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत. थंडीच्या या दिवसांमध्ये अनेक आजार निर्माण होत असतात. मग ताप, थंडी, सर्दी, खोकला असे अनेक आजार निर्माण होताना दिसतात. 

Source : Google

त्यात थंडीच्या दिवसात लोक जास्त पाणी पित नाहीत. कारण हिवाळ्यामध्ये जास्त तहान लागत नाही. त्यामुळे लोकं फार कमी पाणी पितात.  

Source : Google

मग कमी पाणी पिल्यामुळे त्याचे आपल्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. मग लोकांना अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. 

Source : Google

किडनीवर वाईट परिणाम- जर तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये कमी पाणी पिलं तर त्याचा तुमच्या किडनीवर वाईट परिणाम होतो. किडनीवर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नसेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.  

Source : Google

शरीरात पाण्याची कमतरता असेल तर किडनीवर दबाव येतो, त्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा ट्रॅकमध्ये जळजळ अशा समस्या निर्माण होतात. 

Source : Google

त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये तहान जरी लागली नाही तरी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.