Gold Silver Rate Today : मोठी अपडेट! सोने-चांदीचे भाव पुन्हा उतरले

Source : Google

सोने-चांदीने पुन्हा एकदा आनंदवार्ता दिली आहे. वर्षाच्या सरत्या महिन्यात मौल्यवान धातूंनी ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्यापासून विचार करता, सोन्यात जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली आहे. 

Source : Google

तर चांदीने पण माघार घेतली आहे. त्यामुळे ग्राहकांचा जीव भांड्यात पडला आहे. दिवाळीपासून दोन्ही धातूच्या किंमती सूसाट होत्या.  

Source : Google

या आठवड्यात सोने 550 रुपयांनी स्वस्त झाले. गेल्या आठवड्यात मोठी घसरण दिसून आली. सोमवारी, 11 आणि 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमती प्रत्येकी 220 रुपयांनी घसरल्या. 

Source : Google

या आठवड्यात चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3500 रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात 11 डिसेंबर रोजी भाव 200 रुपयांनी कमी झाले. 

Source : Google

मंगळवारी किंमतीत 100 रुपयांची घसरण झाली. 13 डिसेंबर रोजी भाव 700 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.