या आठवड्यात सोने-चांदीच्या अनेक दिवसाच्या तेजीला ब्रेक लागला. सलग दोन दिवस किंमतीत घसरण आली. ऐन लग्नसराईत मौल्यवान धातूंनी मोठी उसळी घेतल्याने वधू पिता चिंतेत होते.
Source : Google
सोन्याने लांबचा पल्ला गाठल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण 5 आणि 6 डिसेंबर रोजी दोन्ही धातूत कमालीची घसरण झाली.
Source : Google
त्याचा फायदा ग्राहकांना झाला. गुरुवारी सोन्यात किंचित वाढ झाली. तर चांदीत घसरणीचे सत्र सुरुच आहे. सोने-चांदीच्या किंमती अजून कमी होण्याची अनेकांची इच्छा आहे.
Source : Google
या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने घसरले. 5 डिसेंबर रोजी सोने 1000 रुपयांनी घसरले.
Source : Google
तर 6 डिसेंबर रोजी त्यात 400 रुपयांची घसरण झाली. आता सोन्याने किंचित उसळी घेतली.
Source : Google
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,930 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.