“तेच मित्र आता सेल्फीसाठी घरी येतात..”; हास्यजत्रेच्या Gaurav More नं सांगितला संघर्ष
Source : Google
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीरांना राज्यभरात प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. त्यापैकीच एक नाव म्हणजे गौरव मोरे.
Source : Google
हा कार्यक्रम गौरवच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो संघर्षाचे दिवस, आर्थिक समस्या, संजू या बॉलिवूड चित्रपटातील त्याची भूमिका अशा विविध विषयांवर मोकळेपणे व्यक्त झाला.
Source : Google
मनोरंजनक्षेत्रात काम करण्याचा हा प्रवास कधीच सरळ नव्हता, असं त्याने सांगितलं. “माझी टिपिकल ऑनस्क्रीन हिरोसारखी पर्सनॅलिटी नाही.
Source : Google
पण सिनेमा आणि कॉमेडीसाठीचं माझं प्रेम ओळखून मी हिरोच्या भूमिकेत काम न करताही वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न केला”, असं तो म्हणाला.
Source : Google
करिअरच्या सुरुवातील गौरवला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. याविषयी तो पुढे म्हणाला, “मी 100 रुपयांत सर्व खर्च भागवायचो.
Source : Google
प्रवास किंवा ऑडिशन्सला जाण्यासाठीचा खर्च मला परवडायचा नाही. मला सुरुवातीला फोनसुद्धा माहीत नव्हता. बऱ्याच काळानंतर मी की-पॅडवाला फोन खरेदी केला होता. मुंबईतल्या पवई फिल्टरपाडा या झोपडपट्टीत मी लहानाचा मोठा झालो.
Source : Google
वस्तूंचं मूल्य काय असतं, हे मला तिथे राहून योग्यरित्या समजलं होतं. आता तिथल्या लोकांना माझ्यामुळे एक ओळख मिळाल्याचं ते सांगतात.
Source : Google
अशा ठिकाणी मी वाढलो, याचा मला अभिमान आहे. कधीकधी प्रसिद्धी तुम्हाला तुमचं मूळ विसरायला लावते. पण मी ते कधीच विसरणार नाही.