अभिनेते, राजकारणी आणि डीएमडीकेचे प्रमुख कॅप्टन Vijaykant यांचं निधन झालं आहे. त्यांच्या कोव्हिड चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
Source : Google
श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मंगळवारी त्यांना नियमित आरोग्याच्या तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केल्याचं डीएमडीकेकडून सांगण्यात आलं होतं.
Source : Google
Vijaykant हे निरोगी असून काही चाचण्यांनंतर ते घरी परतणार असल्याचं पार्टीने सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्यांचा कोव्हिड-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे
Source : Google
आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती.
Source : Google
अखेर आज (गुरुवार) रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं असून त्यांच्या निधनाविषयीची माहिती देण्यात आली.