फॅमिली प्लॅनिंगबद्दल अखेर Deepika Padukone ने सोडलं मौन; म्हणाली “रणवीर आणि मला..”
Source : Google
अभिनेत्री Deepika Padukone आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी ही दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती.
Source : Google
2012 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यामध्ये Deepika-Ranveer जबरदस्त केमिस्ट्री चाहत्यांना पहायला मिळाली होती.
Source : Google
या चित्रपटानंतर दोघांनी काही वर्षे एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर 14 नोव्हेंबर 2018 रोजी इटलीत दीपिका-रणवीरने लग्नगाठ बांधली.
Source : Google
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दीपिका रणवीरसोबत फॅमिली प्लॅनिंगविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
Source : Google
‘वोग सिंगापूर’ला दिलेल्या मुलाखतीत Deepika तिच्या आईवडिलांनी केलेल्या संगोपनाविषयी बोलत होती. “मी ज्या लोकांसमोर लहानाची मोठी झाले, माझ्या काकू, काका, फॅमिली फ्रेंड्स..
Source : Google
ते नेहमीच मला सांगतात की मी जराही बदलले नाही. ते आमच्या संगोपनाविषयी अनेकदा बोलतात. या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्धी आणि पैसा मिळाल्यानंतर बदलणं खूप सोपं असतं.
Source : Google
ती हवा डोक्यात जायला वेळ लागत नाही. पण मला माझ्या घरी कोणीच सेलिब्रिटीची वागणूक देत नाहीत. मी माझ्या घरी असताना एक सामान्य मुलगी आणि सामान्य बहीण असते.
Source : Google
. ही गोष्ट कधीच बदलू नये असं मला वाटतं. माझ्या कुटुंबीयांमुळे माझे पाय जमिनीवर राहतात. हेच मूल्य मला आणि रणवीरला आमच्या मुलांमध्ये रुजवायचे आहेत”, असं Deepika म्हणाली.