Crypto चा बाजार उठणार? Binanceसह 9 परदेशी क्रिप्टो कंपन्यांना केंद्राची नोटीस

Source : Google

केंद्र सरकारने क्रिप्टो करन्सीसह क्रिप्टो एसेट आणि इतर संबंधित कंपन्यांविरोधात पुन्हा कारवाईचा बडगा उगारला आहे. कोणतेही नियम न पाळणाऱ्या या चलनाविषयी केंद्र सरकार पूर्वीपासूनच प्रतिकूल आहे.  

Source : Google

भारतीय रिझर्व्ह बँकेने तर हा अर्थव्यवस्थेला धोका असल्याचे स्पष्ट केले आहे. मोदी सरकारने यापूर्वीच क्रिप्टोतील कमाईवर कर वसूली सुरु केली आहे. 

Source : Google

आता आणखी एक कारवाई झाली आहे. परदेशी क्रिप्टो कंपन्यांना मनी लाँड्रिंग कायद्यातंर्गत नोटीस पाठवण्यात आली आहे. 

Source : Google

देशात या कंपन्यांचे व्यवहार बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. या नव्या संकटाने गुंतवणूकदार आणि कंपन्या धास्तावल्या आहेत.