बंद करा हा शो.. ‘Tarak Mehta..’चा नवीन प्रोमो पाहिल्यानंतर भडकले नेटकरी

टेलिव्हिजनवरील ‘tarak mehta ka oolta chashma’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेला आजवर प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. 

Arrow

Source : Google

मात्र गेल्या काही काळापासून या मालिकेबाबत वाद सुरू आहे. यातील बऱ्याच कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. तर काहींनी निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. 

Arrow

Source : Google

दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून मालिकेतून दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री Disha Vakani गायब आहे.  

Arrow

Source : Google

दिशा पुन्हा मालिकेत कधी येणार, असा प्रश्न चाहत्यांकडून वारंवार विचारला गेला. निर्मात्यांनी नुकताच चाहत्यांना दिलासा देत दयाबेनची वापसी होणार असल्याची गुडन्यूज दिली होती. 

Arrow

Source : Google

मात्र त्यावरूनच आता नेटकरी निर्मात्यांवर भडकले आहेत आणि ते मालिकेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. 

Arrow

Source : Google

दयाबेनची वापसी होणार म्हणून चाहते खूप उत्सुक होते. मात्र मालिकेत तसं काही घडलंच नाही. खरंतर मालिकेतील बऱ्याच एपिसोड्समध्ये दयाबेनच्या वापसीबद्दलची कथा दाखवली जात होती. 

Arrow

Source : Google

काही एपिसोड्समध्ये तर दयाबेनच्या स्वागताचीही तयारी दाखवण्यात आली होती. मात्र आता मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये दाखवलं की दयाबेन येणार नाही. 

Arrow

Source : Google

दयाबेन नाही येणार हे समजताच गोकुलधाम सोसायटीमधील सर्वजणांचा राग अनावर होतो, असं यामध्ये दाखवलं गेलंय. 

Arrow

Source : Google

मात्र केवळ सोसायटीचे लोकच नाहीत तर निर्मात्यांच्या या खेळीवर आता प्रेक्षकसुद्धा चिडले आहेत. इतकंच नव्हे तर अनेकांनी मालिकेवर बंदीची मागणी केली आहे. 

Arrow

Source : Google