प्रत्येक वर्षी कापला जातो तुमचा खिसा; बँकेचे हे चार्जेस माहिती आहेत का?

Source : Google

बँकिंग सेवेचा प्रत्येक जण आज वापर करतो. जनधन योजनेमुळे आणि पोस्ट पेमेंट बँकेमुळे ग्रामीण भागातही बँकिंग सुविधा पोहचत आहेत.  

Source : Google

बँका ऑनलाईन आणि ऑफलाईन सेवा देतात. बँका सेवा शुल्क आकारतात. दरवर्षी अथवा दरमहा असे त्याचे स्वरुप असते. यामध्ये एसएमए सेवा, 

Source : Google

पैसे हस्तांतरण, धनादेश वटवणे, एटीएममधून पैसे काढणे वा इतर दुसऱ्या प्रकारच्या सेवांसाठी ग्राहकांकडून सेवा शुल्क वसूल करण्यात येते. बँकेच्या सर्वच सेवा मोफत मिळत नाही. 

Source : Google

बँक या सेवेपोटी ग्राहकांकडून वेगवेगळे शुल्क आकारते. तुम्हाला माहिती आहे का, किती प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत? वर्षाकाठी तुमच्या खात्यातून कोणत्या सेवेसाठी शुल्क कपात होते? 

Source : Google

प्रत्येक बँक रक्कम हस्तांतरण करण्याची सुविधा देते. एका मर्यादेनंतर रक्कम हस्तांतरीत करायची असेल तर त्यासाठी सेवा शुल्क आकारते. साधारणपणे सरकारी बँका या सेवासाठी 20 ते 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारु शकतात. 

Source : Google

मिनिमम बॅलन्स हा लूटीसाठीचा नवीन प्रकार समोर आणण्यात आला आहे. तुमच्या खात्यात एक आमूक रक्कम नसेल तर बँका,  

Source : Google

बॅलन्स नसल्याचे कारण समोर करत मुळातच कमी असलेल्या रक्कमेतून दरमहा रक्कम कपात करतात. ही सर्वात मोठी लूट आहे.  

Source : Google

सर्व बँका ग्राहकांना NEFT आणि RTGS व्यवहार मोफत मिळतो. मात्र अनेक बँका IMPS व्यवहारावर शुल्क आकारतात. हे शुल्क 1 रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंत असते. 

Source : Google

जर तुमचा धनादेश 1 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला बँकेला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. पण त्यापेक्षा अधिक रक्कमेचा चेक असेल तर शुल्क द्यावे लागते. हे शुल्क 150 रुपयांपर्यंत असते.