13 डिसेंबर 2001 रोजीचा संसदेवरील हल्ला नेमका कसा झाला ? नेमकं काय घडले त्या दिवशी

Source : Google

देशातील लोकशाहीचे मानबिंदू समजल्या जाणाऱ्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी अमानूष दहशतवादी हल्ला झाला होता. या घटनेला आज 22 वर्षे पूर्ण होत आहेत.  

Source : Google

आजच्या दिवशी संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना पांढऱ्या एम्बेसेडर कारचा वापर करीत संसदेत अतिरेकी घुसले आणि त्यांनी ए.के.47 ने अंधाधुंद गोळीबार केला होता.  

Source : Google

या हल्ल्यात संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी आणि दिल्ली पोलिस असे एकूण नऊ जण शहीद झाले तर 15 जण जखमी झाले.  

Source : Google

या हल्ल्याप्रकरणात प्रमुख आरोपी अतिरेकी मोहम्मद अफझल गुरु याला 9 फेब्रुवारी 2013 रोजी फासी देण्यात आली होती. 

Source : Google

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना सकाळी पाच दहशतवाद्यांनी संसदेत पांढऱ्या रंगाच्या अॅम्बेसिडरमधून आले होते. त्यांना संसदेच्या आवारातील सुरक्षा दलांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताचे त्यांच्यावर अतिरेक्यांनी फायरिंग करीत त्यांना ठार केले. 

Source : Google

सुरक्षा दलांनी स्वत:च्या प्राणाची आहुती देऊन पाचही दहशतवाद्यांना ठार केले. या हल्लात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, सीआरपीएफची एक महिला कॉन्स्टेबल आणि संसदेचे दोन गार्ड शहीद झाले. 

Source : Google

हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वी तत्कालिक पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी संसंदेच्या बाहेर पडल्या होत्या. 

Source : Google

परंतू उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपा नेते प्रमोद महाजन सेंट्रल हॉल परिसरात होते. या सर्वांना तात्काळ संसदेतील एका गुप्तस्थळावर हलविण्यात आले.