‘Animal’मधील बॉबी देओलच्या एण्ट्रीचा सीन कसा शूट झाला? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?
Source : Google
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'Animal' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात कमाईचा 700 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे
Source : Google
या चित्रपटातील सीन्स, डायलॉग, गाणी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत. चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेसोबतच बॉबी देओलच्या भूमिकेचीही तितकीच चर्चा होत आहे.
Source : Google
Bobby Deol च्या एण्ट्री सीनने नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पाडली आहे. डोक्यावर दारुचा ग्लास ठेवून नाचतानाचा बॉबी काहींना इतका आवडलाय की तोच सीन रिक्रिएट करत अनेकांनी व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
Source : Google
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Bobby ने तो सीन कसा शूट केला, याविषयी सांगितलं.
Source : Google
"त्यांनी मला आधी गाणं ऐकवलं होतं. दिग्दर्शकांना संगीताची खूप चांगली समज आहे. चित्रपट निर्मितीतील प्रत्येक गोष्टीचा त्यांचा चांगला अभ्यास आहे.
Source : Google
नी हे गाणं शोधून काढलं आणि मला म्हणाले की तुझ्या एण्ट्रीच्या सीनला बॅकग्राऊंडमध्ये हेच गाणं वाजेल", असं बॉबीने सांगितलं.
Source : Google
डान्स स्टेपबद्दल सांगताना Bobby पुढे म्हणाला, "आम्ही शूटिंग केलं होतं आणि कोरिओग्राफरने सांगितलं की तुम्हाला जसं नाचायचं आहे तसं नाचा. मी थोडा विचार केला आणि त्या गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली.
Source : Google
तेव्हा ते म्हणाले, नाही नाही. Bobby Deol सारखं नाचू नकोस. तेव्हा माझ्या भावाची भूमिका साकारणाऱ्या सौरभने मला डान्स स्टेप करून दाखवण्यास सांगितलं."
Source : Google
"तेव्हा मला अचानक आठवलं की मी लहान असताना आम्ही पंजाबला जायचो. तेव्हा आम्ही ग्लास डोक्यावर ठेवून खेळायचो. आम्ही असं का करायचो हे मला आजवर समजलं नाही.
Source : Google
पण ती गोष्ट अचानक माझ्या डोक्यात आली आणि तसं मी करून दाखवलं. संदीपला तो डान्स खूपच आवडला", असं Bobby ने पुढे सांगितलं.