बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे
काही दिवसांपूर्वी तो भेडिया या चित्रपटात दिसला होता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करू शकला नसला तरी या चित्रपटातील वरुणच्या अभिनयाचं कौतुक झालं
आता यानंतर साऊथच्या एका मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात वरुण धवन झळकणार आहे
साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक अटली एक अॅक्शन चित्रपट बनवणार असून त्यात वरुणची वर्णी लागली आहे
याच चित्रपटातून साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची माहिती मिळाली आहे
या चित्रपटात कीर्ती एक ग्लॅमरस भूमिका साकारणार आहे
त्यामुळेच आता वरुण धवन आणि कीर्तीची फ्रेश जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत
कीर्ती सुरेश साऊथची सुपरहिट अभिनेत्री असून तिला महानटी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे
आता या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत